जागतिक ऑलिम्पिक डे दिनी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

shivrajya patra
सोलापूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने 23, जून रोजी सकाळी 07.30 वा. जिल्ह्यातील खेळाडूंचा व छत्रपती पुरस्कार विजेत्याचा सत्कार व क्रीडा विषयक आयोजन जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका सोलापूर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास खेळाडू, पुरस्कार प्राप्त खेळाडू व क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावं, असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केलं आहे. 

23 जून 1894 साली आंतर राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. या दिवशी आंतर राष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो. जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ट बनविण्याच्या दृष्टीने, प्रोत्साहन देण्यासाठी व प्रवृत्त करण्यासाठी जागतिक ऑलिपिक डे साजरा केला जातो.

तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये, विविध खेळाचे संघटना, एन.सी.सी., नेहरु युवा केंद्र, विविध सामाजिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाणे यामध्ये या ऑलिम्पिक दिन उपक्रमांचे आयोजन करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल, फोटो, जिल्हा क्रिडा कार्यालयास सादर करण्यात यावा, अशी माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी सोलापूर यांनी दिली आहे.

To Top