सोलापूर : नियमबाह्य व बेकायदेशीर रस्ता डांबरीकरण करणाऱ्या नगरपरिषद अधिकारी व ठेकेदार यांचेवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी दिलीप गायकवाड, गोरख गोडसे आणि राजा गुंड यांनी गुरुवारी, १९जून रोजी कार्यकारी अभियंता, सोलापूर यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले. या निवेदनाची दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले असल्याचे कार्यकारी अभियंता कार्यालयानं कळविलं आहे.
कारंबा शाखा मोहोळ वितरिका क्र. 2 कोकणे वस्ती ते घाटणे हद्दीपर्यंत कॅनल साईड पट्टीवरून पाटबंधारे विभागाची रस्ता डांबरीकरणाची परवानगी नसताना नगरपरिषद व ठेकेदार यांनी मोहोळ येथेही धरणे आंदोलन केले होते. यावर निर्णय न झाल्याने या उपोषणकर्त्यांनी सोलापूर येथील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ,भीमा विकास विभाग क्रमांक २, सोलापूर येथील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषण केले.
तत्पूर्वी या विभागीय कार्यालयाने उपविभागीय अधिकारी, भीमा पाटबंधारे उपविभाग, मोहोळ यांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यात आपण करित असलेले उपोषण थांबवावे, असंही सांगण्यात आलंय.
