चालू शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये मोफत प्रवेशासंबंधी आवाहन

shivrajya patra

सोलापूर : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सोलापूर व धाराशिव या दोन जिल्ह्यांचा समावेश होत असून सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा स्तरावर दोन व तालुका स्तरावर एक शासकीय वसतिगृह कार्यरत आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्येही जिल्हा स्तरावर दोन व तालुका स्तरावर एक शासकीय वसतिगृह कार्यरत असून त्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

वसतिगृहाचे नाव - आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, सोलापूर - मंजुर क्षमता 125. ,

आदिवासी मुलींचे शासकीय वसत्तिगृह, सोलापूर- मंजुर क्षमता 125. ,

आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह बार्शी, ता. बार्शी जि. सोलापूर- मंजुर क्षमता 125. ,

आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, धाराशिव- मंजुर क्षमता 125.

आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह, धाराशिव - मंजुर क्षमता 125.

आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह कळंब ता. कळंब जि. धाराशिव - मंजुर क्षमता 125.

या शासकीय वसतिगृहामध्ये www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत (DBT) बेडींग साहित्य व शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी प्रति वर्षाकरीता अभ्यासक्रमनिहाय आवश्यक असलेली खालीलप्रमाणे रक्कम त्यांचे आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.

इयत्ता - इ. 8 वी ते इ. 10 वी-रक्कम रू.3200

इ. 11 वी व इ. 12 वी (कला, वाणिज्य, विज्ञान) इ. 10 वी तसेच इ. 12 वी च्या शैक्षणिक पात्रतेवर आधारीत 2 व 3 वर्षाच्या कालावधीचे पदविका अभ्यासक्रम - रक्कम रू. 4000

इ. 12 वी च्या शैक्षणिक पात्रतेवर आधारीत पदवी अभ्यासक्रम- रक्कम रु. 4500

वैद्यकिय व अभियांत्रिकी - रक्कम रु. 6000

तसेच शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्याना त्यांच्या दैनंदिन भोजन व नाश्त्यासाठी प्रत्येक 3 महिन्यांची आगाऊ खालीलप्रमाणे रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.

वसतिगृह दर्जा - अ. ब व क वर्ग महानगरपालिका, विभागीय शहरातील वसतिगृहे- मासिक रक्कम- 3500 रुपये, जिल्हास्तरावरील सर्व वसतिगृहे - मासिक रक्कम- 3000 रूपये

तालुका स्तरावरील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन ठेकेदारामार्फत दैनंदिन भोजन व नाश्ता दिला जातो. तसेच शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे निर्वाह भत्ता अदा केला जातो.

वसतिगृह स्तर - अ, ब व क वर्ग महानगरपालिका, विभागीय शहरातील वसतिगृहे निर्वाह भत्ता रक्कम मासिक - 800 रू.

जिल्हा स्तरावरील सर्व वसतिगृहे- निर्वाह भत्ता रक्कम मासिक- 600 रुपये

तालुका स्तर - निर्वाह भत्ता रक्कम मासिक - 500 रूपये

तरी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यानी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळाद्वारे उक्त शासकीय वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश घेणेबाबत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर सागर नन्नवरे यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे.

To Top