सोलापूर : जागतिक योग दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तथा सोलापूर शहर भारतीय जनता पार्टी शहर उत्तर पूर्व मंडलतर्फे आमदार विजयकुमार देशमुख व माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शनिवारी, 21 जून रोजी सकाळी सहा वाजता जुना विडी घरकुल प्रभाग क्रमांक 10 व 11 च्या वतीने हिरा मोती, सोना चांदी चौकामध्ये योग शिबिर पार पडले.
यावेळी योग शिक्षक दुर्गाप्रसाद, प्रवीण कोटा यांनी योग शिबिरास प्रशिक्षण दिले. यावेळी या भागातील बहुसंख्य नागरिक व जुना विडी घरकुल भागातील भारतीय जनता पार्टी सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
