संभाजीराव शिंदे विद्यामंदिर येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

shivrajya patra

सोलापूर : जागतिक योग दिनानिमित्त हैदराबाद रोडवरील विडी घरकुल परिसरातील संभाजीराव शिंदे विद्यामंदिर  येथील विद्यामंदिरच्या भव्य प्रांगणात जागतिक योग दिन शनिवारी, 21 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षासन, चक्रासन, शलभासन, अनुलोम विलोम, कपालभारती इत्यादी योगासने घेण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. हा कार्यक्रम सकाळी 07 ते 09 या वेळेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे निखिल सत्यनारायण चेन्नूर योगेश पेगड्याल, आनंद अरविंद अवधूत यांनी मन व शरीर निरोगी राहण्यासाठी बौद्धिक व प्रायोगिक पध्दतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाला संस्था सदस्या डॉ. सौ. राधिका चिलका, प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक सतीश मल्लाव, मार्गदर्शिका तनुजा मारपल्ली आणि ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख नवनाथ व्हटकर उपस्थित होते.

यावेळी संस्था सदस्या डॉ. सौ. राधिका चिलका  यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, विद्यार्थी- पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राखी कोंगारी यांनी केले तर सौ. करुणा जामदार यांनी सर्वांचे आभार मानले.

To Top