सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर, इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट आणि सोलापूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूरयांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी शुक्रवारी, 13 जून रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने रो. सीए. सुनिल माहेश्वरी, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ सोलापूर, रो. ब्रीजकुमार गोयदानी, सचिव, रो. आकाश बाहेती, प्रकल्प प्रमुख, रो. जयेश पटेल, डिस्ट्रीक गव्हर्नर, संग्राम पाटील, CSR मॅनेजर इक्विटास डेव्हलपमेंट, श्रीमती माधुरी मुसळे, CSR मॅनेजर इक्विटास डेव्हलपमेंट, वैभव उकर्डे, इक्विटास डेव्हलपमेंट, सचिन राठोड, इक्विटास डेव्हलपमेंट याच्या सहकार्याने सदर रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, आय. टी. आय. वेल्डर, फिटर, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, ऑफिस असिस्टंट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशीय, मशिन ऑपरेटर, बी. कॉम, एम. कॉम, अशा प्रकारची एकुण 1492 पेक्षा जास्त रिक्तपदे 26 उद्योजकांनी ऑनलाईन अधिसुचित केलेली आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिझ्यूमच्या तीन प्रती आणि कागदपत्रासह शुक्रवारी, 13 जून 2025 रोजी ठीक सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत "ड्रिम पॅलेस बैंक्वेट हॉल, सरस्वती चौक, सोलापूर" येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत 0217-2992956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर, श्रीमती संगीता खंदारे यांनी केले आहे. अधिक माहितीस्तव https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट द्यावी.