सोलापूर : शेगांवहून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच, पहिला मुक्काम दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगांव येथे मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात स्वागत करण्यात आले.
"साधू संत येते घरा, तोचि दिवाळी दसरा" या ओवीप्रमाणे उळेगाव भक्तीमय रंगले.
पालखीचे स्वागत आमदार सचिन कल्याणशेट्टी, उपसरपंच नेताजी खंडागळे, जिल्हा प्रशासन, उळे आणि पंचक्रोशीतील नागरिक यांच्या उपस्थितीत पार पडले. ग्रामस्थांकडून राहण्याची व महाप्रसादाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली.
