भंडारा/प्रतिनिधी : दी अबॅकस वर्ल्ड द्वारे या महिन्याच्या पहिल्या सप्ताहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत आमगाव दिघोरी येथील देवांश पराग बारई पहिली लेव्हल मध्ये राज्यात प्रथम तर श्लोक सुधाकर जगनाडे पहिली लेव्हल मध्ये राज्यात चॅम्पियन रँक प्राप्त केली. या यशाप्रित्यर्थ उभयतांचं सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
दी अबॅकस वर्ल्ड द्वारे, 07 जून रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन केलं होतं. या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून या स्पर्धेमध्ये 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांच्या सुप्त मानसिक गुणांचा विकास व्हावा, त्यासोबतच भविष्यातील स्पर्धांना विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाता यायला हवे, याचा सराव व्हावा, या अनुषंगाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
(रायबा) शिव-शंभू चरित्र अभ्यासक, लेखक व शिवशंभू व्याख्याते राहुल नलावडे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वस्तू व अँकर विदुला बाविस्कर (मराठी नायिका) या उपस्थित होत्या. दि अबॅकस वर्ल्ड संचालक गणेश बनकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये जूनियर लेवल, लेवल 1 व लेवल 2 मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफीज व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आमगाव दिघोरी येथील देवांश पराग बारई पहिली लेव्हल मध्ये राज्यात प्रथम तर श्लोक सुधाकर जगनाडे पहिली लेव्हल मध्ये राज्यात चॅम्पियन रँक प्राप्त केली. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आमगाव येथील अबॅकस चे संचालक स्वप्नील गजभिये यांना दिलं आहे.