०२ जिल्ह्यातून तिघे तडीपार

shivrajya patra

सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एमआयडीसी आणि सलगर वस्ती पोलीस ठाण्याकडून आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांच्या कार्यवाहीनंतर शाहरुख गुडुभाई पटेल (वय-३१ वर्षे), प्रेम भास्कर कुणी (वय-२५ वर्षे) आणि सतिश दत्ता जाधव (वय-३१ वर्षे) या तिघांना सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलं आहे.

१. सतिश दत्ता जाधव (रा. सेटलमेंट फ्रि. कॉलनी नं. ०३, सोलापूर) याच्याविरुध्द २०२० व २०२४ या कालावधीमध्ये घरफोडी, जबरी चोरी यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुध्द सलगर वस्ती पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

२. शाहरुख गुडुभाई पटेल (रा. ७१, विष्णु नगर भाग-२, मजरेवाडी, सोलापूर) याच्याविरुध्द २०१७, २०१९, २०२३ व २०२४ या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, महिला अत्याचाराचे गुन्हे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

३. प्रेम भास्कर कुणी (रा. ५०, राज नगर, बोळकोटे नगरच्या बाजूला, एमआयडीसी, सोलापूर) याच्याविरुध्द २०१८,२०२१,२०२३ व २०२४ या कालावधीमध्ये घरफोडी, चोरी, दरोड्याचा प्रयत्न व महिला अत्याचार यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता.


To Top