सोलापूर : येथील मुरारजी पेठेतील ड्रीम पॅलेस बँक्वेट हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह्ज ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी, १३ जून रोजी महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. हा मेळावा सकाळी १० ते दुपारी ३ वा. दरम्यान वेळेत होत अमल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष रोटे सिए सुनील माहेश्वरी यांनी मंगळवारी सकाळी एका पत्रकार परिषदेत दिली.
या रोजगार महामेळाव्यात २० हुन अधिक कंपन्यांचा सहभाग असून त्यात बँकिंग, रिटेल, लॉजिस्टिक्स, ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक, टेलिकॉम, बीपीओ, मार्केटिंग, डेटा एन्ट्री आरोग्य सेवा आणि ऑटोमोबाईल्स आदी सामील आहेत. या रोजगार मेळाव्यात कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी, मॅनेजमेन्ट, समाज शास्त्र, अशा सर्व शाखांच्या डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलध होणार आहेत, शिवाय अल्प शिक्षित उमेदवार जसे ५वी १०वि किंव्हा १२ पास/नापास, ITI याना सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आयोजकातर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले असून अशा उमेदवारांसाठी नियोक्ते सामील होणार आहेत. सर्वसमावेशक असा हा विशेष रोजगार मेळावा असणार आहे, असं रोटे सिए सुनील माहेश्वरी यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उमेदवारांनी मेळाव्यात प्राधान्याने मुलाखतीच्या संधीसाठी QR कोड स्कॅन करून पूर्व नोंदणी करावी असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आलं आहे, काही कारणास्तव पूर्व नोंदणी करता नाही आली तरी मेळाव्याच्या दिवशी स्पॉट नोंदणी करून सहभागी होता येईल. उमेदवारांनी बायोडाटा (एकाहून अधिक प्रती), वैध ओळखपत्र व शैक्षणिक कागदपत्रे सोबत आणावीत.
या मेळाव्यात समाविष्ट होण्यासाठी उमेदवाराकडून कुठलेही नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नसून हा रोजगार मेळावा उमेदवारासाठी पूर्ण नि:शुल्क असल्याचंही माहेश्वरी यांनी यावेळी म्हटले.
नोकरी बाजार मध्ये एक विरोधाभास निर्दशनास येतो. बेरोजगारीचे प्रमाण उच्च असताना, अनेक कंपन्या खुल्या पदांसाठी योग्य उमेदवार शोधण्यात संघर्ष करतात. ही परिस्थिती उमेदवारांचे कौशल्य आणि कंपन्यांची अपेक्षा यांच्यातील विसंगती मुळे होते. या सर्वसमावेशक रोजगार मेळाव्याचा उद्देश ही विसंगती दूर करून उमेदवार आणि कंपनी यांच्यात योग्य सांगड घालण्याचा प्रयत्न आहे.
इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह्ज ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर हे सर्वात जास्त ज्यांना गरज आहे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहेत, असे इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह्ज ट्रस्ट चे क्लस्टर मॅनेजर सुजित पतंगे यांनी यावेळी सांगितले.
आयोजकातर्फे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयास आवाहन करण्यात येते कि, त्यांनी या मेळाव्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून त्यांना या मेळाव्याचा फायदा घेता येईल आणि त्यांना रोजगाराची योग्य संधी उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पत्रकार परिषदेस इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह्ज ट्रस्ट तर्फे संग्राम पाटील, सौ. माधुरी मुसळे, वैभव उकर्डे, सचिन राठोड तर रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे जयेश पटेल, ब्रिजकुमार गोयदानी, संदीप झवेरी, आकाश बाहेती आदींची उपस्थिती होती.
अधिक माहितीसाठी रोटेरियन आकाश बाहेती ९६८९२२३४३१/ सचिन राठोड ८८३०५६५१३४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केलं आहे.