हरि श्रीनिवास अम्बरकरने एमएचटी-सीईटीमध्ये १०० टक्के टाइल प्राप्त
सोलापूर : देशातील आघाडीची टेस्ट प्रिपरेटरी संस्था, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडने सोलापूर येथील दोन विद्यार्थ्यांनी देशातील सर्वात कठीण प्रवेश परीक्षांपैकी दोन-नीट यूजी 2025 आणि एमएचटी-सीईटी 2025-मध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची घोषणा केली आहे.
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड सोलापूरच्या क्लासरूम प्रोग्राममध्ये शिकणाऱ्या ओंकार पवार या विद्यार्थ्याने नीट यूजी 2025 मध्ये ऑल इंडिया रँक (एअर) 1064 मिळवून सोलापूर शहर व जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
ही अत्युच्च कामगिरी त्याच्या मेहनतीचे, शिस्तीचे आणि आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या तज्ज्ञ प्राध्यापक मंडळाने दिलेल्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाचे फलित आहे. या परीक्षेचा अधिकृत निकाल नुकताच नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने जाहीर केला.
सोलापूरच्या शैक्षणिक यशात भर घालत, आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचा आणखी एक विद्यार्थी हरी श्रीनिवास अंबरकर याने एमएचटी-सीईटी 2025 मध्ये १०० पर्सेंटाइल मिळवले आहेत. हरीचे हे यश महाराष्ट्रात नुकतेच सुरू झालेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या सीईटी (कॉमन एंट्रन्स टेस्ट) कोर्सच्या गुणवत्तेचे द्योतक आहे.
हा कोर्स विशेषतः १० वी व ११ वीतील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला असून, राज्यस्तरीय इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहे. आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचा सीईटी प्रोग्राम इंग्रजी माध्यमातून दिला जातो, आणि बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर सुरू होतो. हा कार्यक्रम राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः डिझाइन करण्यात आला आहे, आणि त्यात सीबीएसई अभ्यासक्रमालाही समांतर शिक्षण दिले जाते.आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या स्थानिक परीक्षांच्या स्वरूपाशी सुसंगत दर्जेदार कोचिंग देण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा एक भाग आहे.
या यशांवर प्रतिक्रिया देताना आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे मुख्य शैक्षणिक व व्यवसाय प्रमुख डॉ. एच.आर.राव म्हणाले,नीट यूजी आणि एमएचटी-सीईटी 2025 मध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली कामगिरी अत्यंत अभिमानास्पद आहे. लाखो विद्यार्थ्यांमध्ये अव्वल रँक मिळवणे हे त्यांची मेहनत, पालकांचा पाठिंबा आणि आमच्या प्राध्यापकांच्या समर्पणाचे प्रतिक आहे. आम्ही देशभरातील विद्यार्थ्यांची प्रतिभा घडवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या स्वप्नातील करिअरकडे वाटचाल करण्यास मदत करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत.
नीट यूजी ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी दरवर्षी आयोजित करते आणि ती भारत व परदेशातील एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि इतर आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असते. त्याचप्रमाणे एमएचटी-सीईटी ही महाराष्ट्रातील प्रमुख अभियांत्रिकी कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक महत्त्वाची प्रवेश परीक्षा आहे.
