शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात नव्या पदाधिकाऱ्यांची निवड

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या आदेशानुसार बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रीतम धारिया, सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या हस्ते बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर, मंगळवेढा, बार्शी, मोहोळ येथील पदाधिकारी यांची निवड शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रदेशाध्यक्ष प्रीतम धारे यांच्या आदेशाने निवड करण्यात आली.

नव्यानं निवडण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या हस्ते व सोलापूर शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण सोलापूर जिल्हा बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख साहेबांना तेगेंळी, सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर, शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे, अक्कलकोट शिवसेना शहर उपमुख वर्षा म्हैत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 

त्यात शिवसेना बांधकाम कामगार सेना बार्शी तालुकाप्रमुखपदी बाळासाहेब तुपसमींदर, उपप्रमुखपदी अविनाश कांबळे, सचिव समाधान कांबळे, सहसचिव बाळासाहेब अवघडे, खजिनदार भगवान कडवे, संघटक महेश तुपसमिंदर, 

सहसंघटक सचिन कांबळे, बांधकाम कामगार सेना महिला आघाडी तालुकाप्रमुख आशा बनसोडे, तालुका उपप्रमुख जिजाबाई घळके, बांधकाम कामगार सेना सोलापूर शहर उपप्रमुखपदी सौ. लक्ष्मी रामनळे, शहर संघटकपदी लक्ष्मी यादव, मंगळवेढा तालुका उपप्रमुखपदी विकास भोसले, 

तालुका संघटक सागर टकले, तालुका संपर्क प्रमुख चंद्रकांत कुचेकर, तालुका कार्याध्यक्ष साईराम भडांगे, तालुका सचिव अतुल पवार या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन सोलापूर जिल्हा संपर्क महेश साठे, सोलापूर शहर प्रमुख सचिन चव्हाण, 

बांधकाम कामगार सेना जिल्हाध्यक्ष साहेबन्ना तेगेंळी, जिल्हा महिला आघाडी प्रमुख वैशाली हावनूर, बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

To Top