विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बळावर यशोशिखर गाठावे : जन्मेजयराजे भोसले

shivrajya patra

पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप; श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा संयुक्त उपक्रम

सोलापूर : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या बळावर यशाचे शिखर गाठावे. उच्चपद भूषवून सेवा बजावावी. आपल्या कामाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्यावं, असं आवाहन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी केले.

रविवारी, डफरीन चौकातील आयएमए हॉल येथे सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्यावतीने पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोल भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

विचार मंचावर अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे,  खजिनदार संजय राठोड, विश्वस्त संतोष भोसले, सौरभ मोरे, रोहित खोबरे, ॲड. नितीन हबीब, ॲड. पी. बी. लोंढे-पाटील, सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर, द न्यूज प्लस चॅनलचे प्रमुख तात्यासाहेब पवार, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे आदींची  उपस्थिती होती.

याप्रसंगी दैनिक सकाळ च्या सहयोगी संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिद्धाराम पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनीष केत आणि बी. आर. न्यूज चॅनलच्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अश्विनी तडवळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मनीष केत यांनी आपल्या भाषणात अन्नछत्र मंडळाच्या कार्याचा गौरव केला. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर खजिनदार किरण बनसोडे यांनी उपस्थितांचं आभार मानले.

... चौकट ...

विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवावी : पाटील

विद्यार्थ्यांनी एकाग्रता ठेवली पाहिजे. त्या माध्यमातूनच अभ्यासाच्या जोरावर यश मिळते. निश्चित ध्येय ठरवून नियोजनात्मक वाटचाल केली पाहिजे. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांनी योगा व सूर्यनमस्कार केले पाहिजे, असे मार्गदर्शन सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी केले.

To Top