' भावकी ' ला कंटाळलेल्या कुटुंबियांची इच्छा-मरणाची मागणी; आमरण उपोषण सुरु

shivrajya patra

सोलापूर : वाद कोणाशीही असो तो वाईटच ... त्यात भावकीचा वाद सर्वात वाईट ... याचा सार्थ प्रत्यय आणून आणणारी घटना करमाळा तालुक्यातील शेटफळ (ना.) इथं घडलीय. भावकीच्या त्रासाला कंटाळलेल्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकांकडे व्यथा मांडली. त्यांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे करमाळा पोलिसांना सूचित केले होते, मात्र करमाळा पोलिसांनी त्या सूचनेकडे डोळेझाक करीत गावगुंडांना जणू संरक्षण देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप सौ. प्रतिक्षा अण्णासाहेब पोळ हिनं केलाय, या कुटुंबानं इच्छा मरणाचीच मागणी केली होती. त्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणास प्रारंभ केलाय.

करमाळा तालुक्यातील शेटफळ (ना.) शिवारातील गट क्रमांक 53 मध्ये मशागत करण्यासाठी साहेबराव राजाराम पोळ आणि इतर ७-८ जणांनी विरोध करीत मशागत करण्यासाठी नेलेला ट्रॅक्टर परत पाठविला. सौ. प्रतिक्षा अण्णासाहेब पोळ हिच्या शेतातील ऊसाच्या फड भावकीनं, ०८ मार्च २०२५ रोजी आग लाऊन पेटवून दिला. त्या तक्रारीकडं करमाळा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने त्या कुटुंबियांची वणवण सुरू झालीय.

आपल्या तक्रारीची करमाळा पोलीस दखल घेत नसल्याने सौ. प्रतिक्षा ची नणंद कु. भाग्यश्री तानाजी पोळ हिने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या लोकशाही दिनात, ११ एप्रिल रोजी तिची व्यथा मांडली. 

त्यांनी ती व्यथा ऐकून घेऊन लागलीच करमाळा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना समक्ष बोलावून घेऊन ' त्या ' घटनेतील सर्व संबंधितांना लवकरात लवकर अटक करण्याचे तोंडी आदेश दिले, आजतागायत ४० दिवस उलटून गेले, तरी करमाळा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी संबंधितांवर अटक केलेली नाही,ही बाब गंभीर असल्याचं कु. भाग्यश्री तानाजी पोळ हिनं म्हटलं आहे.

०७ मे रोजी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे यांच्याकडं कु. भाग्यश्रीनं लेखी तक्रारी अर्ज केला आहे. ०२ जून २०२५ रोजी करमाळा पोलीस ठाण्यात कु. भाग्यश्रीला आंदोलनाच्या संदर्भात चौकशी करण्याकामी मला बोलाविण्यात आले, मात्र २ ते ३ तास ताटकळत थांबवून चौकशी न करताच तिला पाठवून दिल्याचा तिचा आरोप आहे.

या परिवारानं मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घरातील छोट्या लेकरांसह आमरण उपोषणास प्रारंभ केलाय. गुन्हेगार प्रवृत्तीच्या साहेबराव राजाराम पोळ, लहु पोळ, सोमनाथ मारुती पोळ, अजित पोळ, शशिकांत अजिनाथ पोळ, लालासाहेब पोळ, प्रकाश पोळ, तुकाराम पोळ यांची कसून चौकशी करुन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केलीय.

To Top