मंगळवारी, आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महापालिकेकडील अधिकारी, शहर काझी, मुस्लीम धर्मगुरु, शहरातील प्रमुख मशिदींचे विश्वस्त, शहरातील प्रमुख ईदगाह मैदान यांचे विश्वस्त उपस्थित होते. पोलिस आयुक्त एम. राज कुमार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी प्रास्ताविक करून बैठक आयोजनामागील उद्देश विशद केला. यावेळी पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, महापालिकेचे किशोर सातपुते, महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विशाल येवले यांच्यासह कमिटीचे सदस्यांची उपस्थिती होती.
पोलिस आयुक्तांनी नागरिकांनी मांडलेल्या अडी-अडचणीचं निरसन केलं. कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहनही एम राज कुमार यांनी केलंय.
... जातीय सलोखा राखावा अबाधित !
कुर्बानीनंतर सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा उघड्यावर कोणतीही घाण, रक्त किंवा मांस पडणार नाही, याची दक्षता घ्यावी.
स्वच्छतेचे पालन करून रोगराई, दुर्गंधी पसरणार नाही, याची काळजी घ्यावी. सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, व्हीडीओ फॉरवर्ड न करता ते डिलीट करुन जातीय सलोखा अबाधित राखावा. एखादी अप्रिय अथवा चुकीची घटना आजूबाजूला घडत असल्यास पोलिसांना त्वरीत माहिती द्यावी. कोणत्याही धार्मिक स्थळी आक्षेपार्ह भाष्य करू नका. बकरीदच्या नमाजाचे वेळी प्रत्येक ईदगाह येथे अनुषंगाने आवश्यकतेनुसार जबाबदार स्वयंसेवक नेमावेत, असंही यावेळी सांगण्यात आलंय.
