सोलापूर : होटगी रोडवरील टाटा कंपनीचे क्रोमा शोरुम फोडून, चोरट्याने शोरुममधील विविध कंपन्यांचे ७८ महागडे मोबाईल फोन व एक क्रोमा शोरुमची काळ्या रंगाची सॅक (पिशवी) असा ४०,४१,२२० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी प्रकरणात रामनिवास उर्फ रामा मंजू गुप्ता (वय- ३७ वर्षे) याला शहर गुन्हे शाखेने गजाआड केलंय. त्याच्या ताब्यातून ३६,३३,८२९ रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात यश आलंय. हा आरोपी आंतरराज्यीय घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली कधीच माहिती की, गुरुवारी, २९ मे ते रात्री अज्ञात चोरट्यानं, टाटा क्रोमा शोरुमचे फोडून ४०,४१,२२० रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे ६७ महागड्या किंमतीचे मोबाईल चोरून नेले असल्याची फिर्याद जितेंद्र दिलीप वाणी (रा. रोहीणी नगर भाग-३, ओम गर्जना चौक, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल केली.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हे शाखेचे व.पो.नि. सुनिल दोरगे, स.पो.नि. शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळास भेट देऊन घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले. तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळाचे आजू-बाजूचे परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज व तांत्रीक माहितीचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले.
त्या आधारे, सपोनि खेडकर व तपास पथकास एका अनोळखी व्यक्तीवर संशय निर्माण झाला. त्याअनुषंगाने, त्या अनोळखी इसमाची अधिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली असताना, तपास पथकास, ०३ जून रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात संशयीतरित्या फिरत असताना रामनिवास उर्फ रामा गुप्ता (रा. सध्या बिहार नगर, सत्यभामा चाळ नं.२, टाटा पावर हाऊस जवळ, दिवा (पूर्व) ठाणे, जि. ठाणे) याला चोरी केलेल्या मोबाईल फोनसह ताब्यात घेतले.
त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता, त्याने टाटा क्रोमा शोरूममधील मोबाईल चोरीप्रकरणी दाखल गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यास या गुन्ह्यात अटक करणेत आलीय.
सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे तपास पथकाने, गुन्हयाचे तपासात, आरोपीकडून, होटगी रोडवरील टाटा क्रोमा शोरुममधुन चोरी केलेले अॅपल, सॅमसंग, वन प्लस, ओप्पो, विवो, नथिंग अशा विविध कंपन्यांचे ६७ महागडे मोबाईल फोन व एक काळ्या रंगाची सॅक तसेच आरोपीकडं त्याचा वापरत असलेला मोबाईल फोन असा ३६,३३,८२९ (छत्तीस लाख तेहतीस हजार आठशे एकोणतीस) रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. शैलेश खेडकर, स.पो.नि. विजय पाटील आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी पार पाडली.
चौकट ...
आरोपी गुप्ताविरूध्द पाच राज्यात गुन्हे दाखल
हा गुन्हा सपोनि शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकाने अत्यंत कमी कालावधीत कौशल्याने, अविरत परिश्रम घेऊन उघडकीस आणला. गुन्हेगार रामनिवास उर्फ रामा मंजू गुप्ता याचेवर, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र अशा विविध राज्यात घरफोडी-चोरीचे व मोबाईल शॉपी फोडून चोरी केल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेकडून सांगण्यात आलंय.
चौकट ...
...यांनी पार पाडली कामगिरी !
गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. शैलेश खेडकर, स.पो.नि. विजय पाटील व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, आबा सावळे, अजिंक्य माने, धीरज सातपुते, इब्राहिम शेख, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, अंकुश भोसले, शैलेश बुगड, चालक सतिश काटे, शाम सुरवसे तसेच सायबर पो. स्टे कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.
