अर्जदाराच्या खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा साधण्याचं स्वप्न पाहणाऱ्या झारीतील शुक्राचार्याचा शोध सुरू !

shivrajya patra

हा तर मला बदनाम करण्याचा डाव; हत्तूरे मामा म्हणाले, मी कायदेशीर कारवाई करेन

सोलापूर : महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे उपाख्य मामा यांच्या विरोधात एका महिलेनं घरजागेच्या प्लॉटबाबतीत तिला कब्जा न दिल्याची तक्रार सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडं केलीय. या तक्रारीमागं मला सामाजिक कार्य पटलावर बदनाम करण्याचा हा डाव असल्याचं श्रीशैल हत्तुरे यांनी म्हटलंय.

श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना ते कुंभारी रस्त्यावर श्रीशैल हत्तुरे यांचं प्लॉटिंग आहे. त्यातील प्लॉटसंदर्भात कब्जा न मिळाल्यानं आपली फसवणूक झाल्याची लिखीत तक्रार शारदा बिराजदार यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे केली. तक्रारदारांमध्ये शहर भारतीय जनता पार्टीच्या महिला उपाध्यक्ष शारदा बिराजदार, रेवणसिद्ध श्रीशैल माळी आणि श्रीशैल म्हैसलगीकर यांची नावे आहेत.

श्रीशैल हत्तुरे राजकीय पटलावरचा 'मोहरा' नसून सामाजिक कार्यपटलावरील 'चेहरा' अशी श्रीशैल हत्तुरे जनमाणसांत ओळख आहे. समाजातील सर्व जाती-धर्म अन् घटकांना सोबत घेऊन जाणारा 'वाटाड्या' असाच त्यांचा आजपर्यंतचा सामाजिक प्रवास संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला ज्ञात आहे, ज्यामुळे ते 'मामा' या उपनामानं सर्वदूर परिचीत आहेत.

सर्व समाजातील गोरगरीब, दिव्यांग, गरजू लोकांना ' मामा ' या नात्यानं निरपेक्ष भावनेने मदत करीत आले आहेत. ते धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यामुळे त्यांना बदनाम करण्याच काम चालू असल्याची चर्चा जनमाणसात सुरू आहे.

या तक्रारीच्या आडून हत्तुरे मामांची सामाजिक पटलावरील प्रतिमा कलंकित करण्याचं षड्:यंत्र काही विरोधक करीत आहेत. त्या अर्जदाराच्या खांद्यावर बंदूक ठेऊन 'मामा' वर निशाणा साधण्याचा डाव सुरू आहे. जे कोणी हा डाव खेळत आहेत, त्या झारीतील शुक्राचार्याला ते शोधून नक्की काढणारच. विनाकारण बदनामी करणाऱ्या विरोधात कायदेशीररित्या उत्तर देण्याची तयारी मामांनी सुरू केल्याचंही समजते.

---चौकट---

... अशा प्रवृत्तीला लवकरच त्यांची जागा दाखविन 

दरम्यान या प्रकरणी श्रीशैल हत्तुरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना, तो प्लॉट तक्रारदार यांच्या ताब्यात आहे, त्या ठिकाणी बोअर मारण्यात आली आहे. हा मला बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. मी एवढे सहकार्य केले असताना जर ते असं वागत असतील, तर ते योग्य नाही. याबाबत मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगताना जाणीवपूर्वक प्लॉटधारकांना पुढे करून माझ्याविरोधात राजकीय षड्:यंत्र रचलं जात आहे. त्याचा मी शोध घेणार असून अशा प्रवृत्तीला लवकरच त्यांची जागा दाखविन.

श्रीशैल हत्तुरे,

अध्यक्ष - महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान, सोलापूर.

To Top