सोलापूर : शालांत प्रमाणपत्र परिक्षा-2025 परिक्षेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेचा निकाल ९१.६६ टक्के लागला. त्यात विशेष प्राविण्य 04 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 16, द्वितीय श्रेणीत 13 आणि 11 उत्तीर्ण झाले.
प्रशालेत कु. पूनम माधव रोकडे 82.00 आणि कु. संजना विश्वनाथ उंबरे 82.00 टक्के एकसमान गुण प्राप्त करून प्रथम आल्या. स्वामी गणेश नंदकुमार 77.20 टक्के आणि कु. सालेहा तस्लिम कारभारी 77.20 टक्के असे एकसमान गुण मिळवत द्वितीय आणि कु. प्रज्ञा अभिमान भांबरे ही 74.20 गुण प्राप्त करून तृतीय स्थानी आली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव चौगुले, सचिव सच्चिदानंद चौगुले, विश्वस्त अमोल चौगुले, प्रशालेचे मुख्याध्यापक बोधीप्रकाश गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, सदस्य व विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
