आफरीन दलाल यांना पीएच.डी. पदवी प्रदान

shivrajya patra

सोलापूर : पिंपरी-चिंचवड येथील उर्दू शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या व सोशल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा सोलापूर शहर बागबान जमियत सिटी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एम. ए. दलाल यांची कन्या आफरीन महिबूब दलाल यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. 

त्यांनी आपला शोध प्रबंध सोशल महाविद्यालयातील उर्दू विभागाचे उपविभागप्रमुख प्रा. डॉ. गौसअहमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली "हसरत मोहानी की इल्मी व अदबी खिदमात का तहकिकी व तनकीदी मुताइला" या विषयावर सादर केला. ही पीएच.डी. पदवी प्राप्त करण्यासाठी त्यांना औसा येथील आझाद महाविद्यालयातील प्रा. डॉ. सरदार पाशा, हैद्राबाद विद्यापीठातील प्रा. डॉ. ए. एम. सय्यद फजलूल्ला यांचे सहकार्य लाभले. 

त्यांच्या या यशाबद्दल पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठातील मानव विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे, सोशल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी, उर्दू विभाग प्रमुख डॉ. शफी चोबदार, माजी प्राचार्य के. एम. जमादार, डॉ. आर. एन. शेंडगे, डॉ. एस. के. पवार, डॉ. जी. एन. चिट्टे, सोशल बँकेचे उपाध्यक्ष हाजी नसीरअहमद  खलिफा, मुद्दसर बागबान यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

सोशल महाविद्यालयातील पीएच. डी. (उर्दू ) संशोधन केंद्रातर्फे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी यांच्या हस्ते आफरीन दलाल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  पीएच. डी.  (उर्दू) संशोधन मार्गदर्शक डॉ. गौसअहमद शेख व डॉ. एम. ए. दलाल उपस्थित होते.

To Top