लाखोंचा प्रतिबंधित गुटखा-सुगंधी तंबाखू जप्त; शहर गुन्हे शाखेची कामगिरी

shivrajya patra

सोलापूर : येथील मुळेगांव रोडवरील अमर ज्योती नगरात अन्न औषध प्रशासनाच्या सहकार्याने शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी, टाकलेल्या छाप्यात ६,७९,६२० रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखु जप्त केली. याप्रकरणी साजिद कय्युम नदाफ (रा. घ. नं. ३४८, उत्तर कसबा, पंजाब तालीम जवळ, सोलापूर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आलंय.

गस्तीदरम्यान शहर गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तपास पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून अमर ज्योती नगरात छापा टाकला. या छाप्यात अवैधरीत्या साठविलेला लाखोंचा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधी तंबाखू हाती लागली.  

त्यात RMD पान मसाला, M सुगंधी तंबाखु, विमल पान मसाला, V-१ सुगंधी तंबाखु व विना लेबल सुगंधी तंबाखु असा ६,७९,६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त कण्यात आला. त्यानुसार साजिद कय्युम नदाफ याचेविरूध्द, एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

To Top