उत्तर सोलापूर : होनसळ येथील दिलीपराव माने कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षा 2025 कला शाखेचा निकाल 92.85 टक्के लागला. महाविद्यालयातील आरती अण्णाराव गायकवाड या विद्यार्थीनीनं 72.80 गुण मिळवून तळे हिप्परगा केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला.
त्याचबरोबर, शितल दत्तात्रय भोसले 67.50 टक्के गुण द्वितीय क्रमांक तर प्रणाली श्रीकांत खेडकर हिने 67 टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थिनींनी इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा तळे हिप्परगा केंद्रात प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. प्रति वर्षाप्रमाणे यंदाही महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी उज्वल यशाची परंपरा कायम राखत नेत्रदीपक यश संपादन केलं आहे.
संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, संस्थेच्या संचालिका रजनी भडकुंबे संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत भडकुंबे, सचिव विकास बनसोडे, सहसचिव अमित भडकुंबे, प्राचार्य राजेंद्र मोहोळकर, सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.