सोलापूर : पहेलगाम येथील निष्पाप पर्यटकांवरील अमानवी हल्ला अन् २६ पर्यटकांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी बुधवारी पहाटे भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर हल्ला चढवला, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याचं धाडस दाखविले. त्याबद्दल भारतीय लष्कराचं अभिनंदन करुन दहशतवादी कारवाया करणाऱ्यास योग्य प्रत्युत्तर दिल्याबद्दल मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, सोलापूरच्या वतीने लाडू वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
निष्पाप भारतीय पर्यटकांना मारणाऱ्या आतंकवाद्यांची पाळं-मुळं खणून काढण्यासाठी केंद्र शासनाने उचललेलं पाऊल आणि कठोर कारवाई करणाऱ्या भारतीय लष्कराचं छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने अभिनंदन करुन विजापूर वेस येथे लाडू वाटून जल्लोष करण्यात आला.
या प्रसंगी मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे. शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, राम गायकवाड, गोवर्धन गुंड, राजू हुंडेकरी, कादर भागानगरी, सरफराज शेख, आरिफ सिंदगी आणि रईस वागदरी आदी उपस्थित होते.
