सोलापूर : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत शासनाने महाराष्ट्रात 587 ठिकाणे निश्चित केली असून त्यांना प्रत्येक ठिकाणी व्यावसायिक वाहने भाडेतत्वावर घ्यायचे प्रस्तावित आहे. संपूर्ण वाहने माजी सैनिकांची असावीत, यासाठी शासन प्रयत्नशील असून, माजी सैनिकांना स्वयंरोजगाराची उत्तम संधी असून या योजनेंतर्गत वाहन भाडेतत्वावर उपलब्ध करुन देणाऱ्या माजी सैनिक/ सैनिकांच्या विधवांना स्वयंरोजगारासाठी देय अनुदान नियमानुसार देण्यात येईल.
एकत्रित नवी वाहन खरेदी, कर्ज उपलब्धता यासाठी शासन स्तरावरुन मदत केली जाणार असून वाहन भाडेकरार मेस्कोमार्फत (MESCO) करणार असून सर्व वाहने मेस्को (MESCO) कडे संलग्न राहणार आहेत.
तरी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र माजी सैनिक/Physical Casualty/Battle Casualty सैनिकांच्या विधवांनी आपली नावे दिनांक 13 मे 2025 पूर्वी जिल्हा सैनिक कार्यालयात नोंदणी करावी, असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार यांनी केलं आहे.
.jpeg)