बहुजन मुक्ती पार्टीचा दणका..! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी दोन अधिकाऱ्यांची उचलबांगडी

shivrajya patra

जातीयवादी शैलैंद्रसिंग जाधव व हरिप्रसाद राऊळ यांची बदली

सोलापूर : महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यास नकार दिलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना ते प्रकरण चांगलंच शेकलंय.  शैलेंद्रसिंग मिठूलाल जाधव अन् वरिष्ठ सहाय्यक हरिप्रसाद राउळ अशी या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावं आहेत. उभयतांच्या कृतिविरूध्द बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश प्रवक्ते अॅड. योगेश शिदगणे यांनी दंड थोपटले होते. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत शासनाने उभयतांची उचलबांगडी केलीय.

सोलापुरातील डॉ. वै. स्मृ. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी, ६ डिसेंबर २०२४ रोजी अभिवादनाची कोणतीही तयारी केली नाही, अशी विचारणा केली असता, असा कोणताही शासन निर्णय नाही, त्यामुळे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार नाही, असं उद्धटपणाचं उत्तर दिलं होतं.

उभयतांनी महामानवाचा अवमान केल्यामुळे बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य युवा आघाडी चे प्रदेश प्रवक्ता अॅड. योगेश शिदगणे यांनी अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर व सचिव वैद्यकीय शिक्षण यांच्याकडे तक्रार केली होती. यासोबतच सोलापुरातील विविध बहुजन व आंबेडकरवादी संघटनांनी प्रशासकीय अधिकारी व वरिष्ठ सहाय्यक यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

या तक्रारींच्या अनुषंगाने २१ मे २०२५ रोजी वरिष्ठ कार्यालयाकडून चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने सखोल चौकशी करून साक्षी पुरावे व जबाब पाहून शासनाकडे अहवाल सादर केला. 

चौकशी अहवालात दोषी आढळल्यामुळे प्रशासकीय अधिकारी शैलेंद्र सिंग मिठूलाल जाधव यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथे तर वरिष्ठ सहाय्यक हरिप्रसाद राऊळ यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथे वैद्यकीय शिक्षण, आयुक्त यांच्या आदेशान्वये बदली करण्यात आलीय. 

अशा तऱ्हेने बहुजन मुक्ती पार्टीच्या पाठपुराव्याला यश आलं आहे, मात्र अॅडवोकेट योगेश शिदगणे यावर समाधानी नसून, यावर बदली हा उपाय नाही, तर त्यांच्यावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई होणे अपेक्षित आहे, असं शिदगणे सांगितलं आहे.

To Top