... आपल्या कामाची चौकट ओलांडून कर्तव्य करणे हाच “रोटरी गौरव ” सन्मान : अधीक्षक भाग्यश्री जाधव

shivrajya patra

सोलापूर : रोटरी नॉर्थ नेहमीच समाजोपयोगी कार्यात अग्रेसर आहे, हा  “रोटरी गौरव ” पुरस्कार वितरण सोहळा त्याचेच हे उदाहरण आहे. या सोहळ्यात गौरव होत असलेल्या मंडळींनी आपल्या क्षेत्रातील कामाची वा  नोकरीची आपली चौकट ओलांडून समाजाविषयी कर्तव्य, जबाबदारी आणि तळमळ आपल्या कार्यातून दाखवून दिलीय,असं गौरवोद्गार राज्य उत्पादन शुल्क च्या अधिक्षक भाग्यश्री जाधव यांनी काढले.

येथील रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ तर्फे समाजाभिमुख अलौकीक कार्य सेवा वृत्तीने करणाऱ्या सोलापुरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना “रोटरी गौरव ” पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्य उत्पादन शुल्क च्या अधिक्षक भाग्यश्री जाधव या बोलत होत्या. 

प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटे. वंदना कोपकर यांनी केले. पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा परिचय अनुक्रमे मधुरा वडापूरकर, आसावरी सराफ, दीपक आहुजा यांनी करून दिला. 

“रोटरी गौरव ” पुरस्काराचे मानकरी डॉ. अरुंधती हराळकर, शोभा मोरे, डॉ. वैशाली शिरशेट्टी, परिमल भंडारी आणि अॅडवोकेट विकास कोडमुर यांना प्रमुख अतिथी भाग्यश्री जाधव यांच्या शुभहस्ते स्मृति चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले.

तत्पूर्वी रोटरी नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ. जानवी माखिजा यांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल देऊन सत्कार केला तर संचालक सुनील दावडा यांनी स्मृति चिन्ह देऊन सन्मान केला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वप्नील कोंडगुळे यांनी केले तर संयोजक सुनील दावडा यांनी उपस्थितांचं आणि मान्यवरांचे आभार मानले. 

यावेळी सुनील दावडा, जयेश पटेल, अण्णासाहेब कोटली, हरेश पटेल, धनश्री केळकर, सीताराम महांकाळ, प्रशांत अपराध, संतोष सपकाळ, युगंधर जिंदे, बाळासाहेब शितोळे, कीर्ती दावडा, क्षितिजा गाताडे, योगिता बोधले, सौ. व बळीराम पावडे आदी उपस्थित होते.

To Top