सोलापूर : जैन अल्पसंख्यांक अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य ललित गांधी हे मंगळवारी, मे रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
27 मे रोजी सकाळी 6.45 वा. सोलापूर विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. शासकीय विश्रामगृह येथून पासपोर्ट कार्यालय येथे आगमन व भेट.
दुपारी 12.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आगमन. जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख यांच्या समवेत आढावा बैठक. दुपारी 01.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 03.00 वा जैन अल्पसंख्यांक महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन स्थळ मोरेश्वर बिल्डिंग, जिल्हा न्यायालयासमोर सोलापूर.
दुपारी 04.00 वा. भगवान महावीर निर्वाण कल्याणक निबंध स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभ–जैन समाज पदाधिकारी संवाद बैठक–स्थळ नियोजन भवन सभागृह येथे. सायं. 05.30 वा. जिल्ह्यातील व्यापारी–उद्योजक संघटना पदाधिकारी यांची बैठक- स्थळ नियोजन भवन सभागृह. सायं. 06.00 वा. आर्यनंदी सहकारी पतसंस्था व आर्यनंदी परिवार कार्यालयास सदिच्छा भेट. त्यानंतर रात्री 10.30 वा सिध्देश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
