पोलीस आयुक्तालयात कोटपा कायदा कार्यशाळा; उपस्थितांनी घेतली तंबाखूविरोधी शपथ

shivrajya patra

सोलापूर : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष, ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा रुग्णालय, सोलापूर शहर यांच्या समन्वयाने शुक्रवारी, २३ मे रोजी येथील पोलीस आयुक्तालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेचे उद्धघाटन सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर, सदर कार्यशाळेचे सुत्रसंचालन गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांनी केलं. 

या कार्यशाळेस सोलापूर जिल्हा शल्यचिकीत्सक सुहास माने यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी सोलापूर पोलीस आयुक्तालय, सर्व पोलीस ठाणे व शाखेकडील पोलीस अधिकारी-अंमलदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 

त्याचप्रमाणे मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले यांनी कोटपा अधिनियम २००३ मधील विविध कलमांबाबत माहिती देऊन, या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासंबंधी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती निकीता गायकवाड यांनी टोबॅको बर्डन संबंधी तसेच, श्रीमती मंजुश्री मुळे यांनी डी. टी. सी. सी. संबंधी उपस्थितांना माहिती दिली. 

अखेरीस मराठवाडा ग्रामीण विकास संस्था विभागीय व्यवस्थापक श्रीमती अन्नपुर्णा ढोरे यांनी आभार व्यक्त करुन, कार्यशाळेस उपस्थित सर्व उपस्थितांना तंबाखू विरोधी शपथ दिली. या कार्यशाळेसाठी डॉ. स्वप्नपरी दळवी, अमित महाडीक, पोलीस अंमलदार सिद्धाराम देशमुख व अजय गुंड यांचं विशेष सहकार्य लाभले.

To Top