सोलापूर : राज्याचे कृषि मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे रविवारी, 25 मे रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवारी, 25 मे रोजी पुणे येथून मोटारीने दुपारी 02.30 वा. पंढरपुरातील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे प्रयाण, दर्शनास उपस्थिती. दुपारी 03.30 वा. पंढरपूर येथून माढा तालुक्यातील अरण कडे प्रयाण. 04.00 वा. अरण येथे आगमन घाडगे फार्म पहाणी व राखीव. 04.30 वा अरण येथून मोटारीने करमाळा तालुक्यातील शेलगांव-वांगी कडे प्रयाण. सायं. 05.30 वा. शेलगांव-वांगी येथे आगमन व तालुका फळरोपवाटीका, जेऊर व केळी संशोधन केंद्र शेलगांव येथे भेट व राखीव.
सायं. 06.00 शेलगाव वांगी येथून कंदर कडे प्रयाण. सायं. 06.30 कंदर येथे आगमन व किरण डोके, फळांचे पुरवठादार यांचे पॅक हाऊस व कोल्ड स्टोरेज प्री कुलिंग पहाणी व राखीव .सायं. 07.30 वा. कंदर येथून माढा तालुक्यातील भीमानगर कडे प्रयाण. रात्री 08.00 वा उजनी, शासकीय विश्रामगृह, भीमानगर येथे आगमन व मुक्काम करतील, असं सांगण्यात आलंय.