Type Here to Get Search Results !

मोहोळ नगरपरिषदेतील कंत्राटी कामगाराचा मस्तवालपणा

मोहोळ : येथील नगर परिषद कंत्राटी चावी वाला अशी ओळख असलेल्या कंत्राटी कामगार मस्तवालपणा करीत असल्याची परिसरातील नागरिकांची ओरड आहे. त्याच्या कामाची मनमानी पध्दती हीच नागरिकांच्या समस्येचे मूळ कारण असल्याचं दिसून येत आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मोहोळ नगरपरिषदमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेला ' चावी ' वाला मोहोळ नगरपरिषद च्या कार्यक्षेत्रातील जुन्या नळाला मनाला येईल, तेव्हा १५ ते २० दिवसाला एक वेळ १० मिनिटे पाणीपुरवठा सुरु ठेवतो, त्यानंतर लगेच पाणी गायब होते. 

या परिसरातील वयोवृद्ध महिलांनी पाणी सोडणार आहे का ? असे विचारले असता तो मस्तवाल कंत्राटी कामगार हा या वृद्ध महिलांना अरेरावी व आरडा-ओरडा करून दमदाटी करीत असल्याचे या महिलांनी माध्यम प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.

या परिसरासाठी पाणी सोडणाऱ्या चावीवाल्या कंत्राटी कामगाराला हटवून त्या ठिकाणी दुसऱ्या कामगाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी या परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.