मुसद्दीक बागवान याचं एस.एस.सी. परिक्षेत उज्ज्वल यश; गणित-विज्ञानात ९७ गुण

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागातील फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत मुसद्दीक मोबीन अहमद बागवान यांनी उत्तम यश मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केलीय. मुसद्दीक यानं ५०० पैकी ४४९ गुण मिळवत ८९.८० टक्के गुण मिळविले. त्यास गणित व विज्ञान या दोन्ही विषयांमध्ये ९७ गुण मिळाले आहेत. त्यांच्या या यशामुळे शाळेत व परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

मुसद्दीक याला मिळालेल्या यशामागे त्याचं परिश्रम, शिस्त आणि चिकाटी असल्याचे मानलं जात आहे. त्याचा बागवान परिवारात नुकताच सत्कार करून त्याचं अभिनंदन करण्यात आलं आहे.

To Top