महसूल मंत्री शासकीय बैठका झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागरिकांना भेटणार
सोलापूर : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवारी, 29 मे रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी सकाळी 9.00 वाजता नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी सोलापूर यांचा आढावा, सकाळी 11.00 वाजता नोंदणी महानिरीक्षक यांचा सोलापूर जिल्हा आढावा तसेच जमाबंदी आयुक्त यांचा सोलापूर जिल्हा आढावा घेणार आहेत.
या शासकीय बैठका झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे नागरिकांना भेटणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिलीय.
