सोलापूर :येथील दैनिक 'पुण्यनगरी ' चे उपसंपादक शरीफ सय्यद यांच्या मातोश्री सायराबानो चांदसाहेब सय्यद यांचं वार्धक्यात बुधवारी, 28 मे अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांचा जन्म, भारतीय स्वातंत्र्यदिवस, १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाला होता, हेही विशेष उल्लेखनिय होय. त्या मृत्यूसमयी ७८ वर्षीय होत्या.
होटगी रोड येथील सहारा नगर-१ येथील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघून सायंकाळी मोदी कब्रस्तान येथे त्यांचा दफन विधी (सुपूर्द-ए-खाक) झाला.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून-नातवंडे असा परिवार आहे. त्या ' पुण्यनगरी ' चे शरीफ सय्यद यांच्या मातोश्री होत.
