Type Here to Get Search Results !

तपिश घरडे संशयास्पद मृत्यूप्रकरणी बुधवारी भंडारा येथे पत्रकार परिषद; १६ मे रोजी रास्ता रोको आंदोलन


भंडारा/प्रतिनिधी : तुमसर तालुक्यातील पिटेसूर येथील तपिश घरडे यांच्या संदेहास्पद मृत्यूला न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांच्या पालकांनी तब्बल ३७ दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात भीम आर्मीने देखील समर्थन देत मागील सात दिवसांपासून या उपोषणात सहभाग घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण मूलनिवासी समाज, विविध सामाजिक संघटना आणि जनतेच्या वतीने शुक्रवारी, १६ मे रोजी भंडारा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन छेडले जाणार आहे.

या आंदोलनाच्या अनुषंगाने आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी १४ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता विश्राम भवन, भंडारा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला सर्व सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

तपिश घरडे यांना न्याय मिळावा, गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी आणि पालकांच्या संघर्षाला प्रतिसाद मिळावा, यासाठी हे एकत्रित आंदोलन निर्णायक ठरणार आहे.