दि प्रोग्रेसिव्ह हायस्कूलची 100 टक्के निकालाची परंपरा कायम

shivrajya patra

सोलापूर : येथील दक्षिण सदर बझार येथील दि प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूल चे विद्यार्थी उज्वल यश संपादन केले. प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही 190 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. या विद्यार्थ्यांत कु. तैय्यबा आकिब शेख आणि कु. महेरुफा मुजाहिद शेख या विद्यार्थीनींनी एकसमान 89.60 टक्के गुण प्राप्त करीत प्रथम क्रमांक पटकावला. 

यंदाच्या यशवंत विद्यार्थ्यांमध्ये 72 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले. त्यात 85 टक्के च्या पुढे एकूण 20 विद्यार्थी आहे. प्रथम श्रेणी घेऊन 71 विद्यार्थी पास झाले तर द्वितीय श्रेणी घेऊन 45 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. यंदाच्या नेत्रदिपक निकालात कु. सादिया इब्राहिम शेख ही विद्यार्थीनी 89.20 टक्के मिळवत द्वितीय तर कु. महेवीश म. दस्तगीर सय्यद यांनी 89.00 टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला. 

शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल गफूर सगरी, शाळेचे अध्यक्ष डॉ. इमाद शेख व सचिव  मजीद शेख यांच्यासह संचालक मंडळ सदस्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी त्यांचेमार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन केले.

To Top