दिलीपराव माने विद्यालयाचा इयत्ता 10 वी चा निकाल 100 टक्के; अस्फिया पटेल प्रथम स्थानी

shivrajya patra

सोलापूर : उत्तर  सोलापूर तालुक्यातील होनसळ येथील दिलीपराव माने विद्यालयाचा इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा मार्च 2025 चा निकाल 100 टक्के लागला. विद्यालयातून अस्फिया पटेल 88.60 टक्के गुण प्राप्त करीत प्रथम स्थानी आली, सुफियान काझी 88 टक्के गुण प्राप्तीनं द्वितीय तर अभय पवार हा विद्यार्थी 79.40 टक्के गुणांनी तृतीय क्रमांक आला. 

विद्यालयातून एकूण 47 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते, सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रति वर्षाप्रमाणे यंदाही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखत नेत्र दीपक यश संपादन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, संस्थेच्या संचालिका रजनी भडकुंबे, संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत भडकुंबे, सचिव विकास बनसोडे, सहसचिव अमित भडकुंबे, मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, सर्व मार्गदर्शक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

To Top