Type Here to Get Search Results !

समाधान माध्यमिक प्रशालेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम; यंदा प्राजक्ता हक्के 88.80 टक्के गुण प्राप्त करून प्रथम स्थानी

सोलापूर : दहिटणे येथील समाधान माध्यमिक प्रशाला शालांत प्रमाणपत्र परिक्षा मार्च-2025 (एस.एस.सी.) या परिक्षेचा यंदाचा निकाल 91.00 टक्के लागला. प्रशालेने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असून  यंदाही मुलीनींच बाजी मारली आहे. कु. प्राजक्ता अमोल हक्के या विद्यार्थीनीनं 88.80 टक्के गुण प्राप्त करीत प्रशालेत प्रथम स्थानी येण्याचा मान मिळवला आहे.

समाधान माध्यमिक प्रशालेतून एस.एस.सी. परिक्षेसाठी 66 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यात 60 परिक्षार्थी उत्तीर्ण झाले. त्यात विशेष प्राविण्यासह 13 परिक्षार्थी, 24 परिक्षार्थी प्रथम श्रेणीत तर 23 परिक्षार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

प्रशालेतून कु. अल्फीया अखलाख शेख ही विद्यार्थीनी 86.60 टक्के गुण प्राप्त करून द्वितीय स्थानी आली. कु. अंकिता लक्ष्मण गायकवाड आणि कु.अक्षरा मल्लिनाथ साखरेमोळ या विद्यार्थीनी 82.60 टक्के गुण मिळवून सामायिकपणे तृतिय स्थानाच्या मानकरी तर कु. विद्या महालिंगराया देवकर  82.40 टक्के गुण चतुर्थ क्रमांक आणि दादा ज्ञानेश्वर कांबळे हा विद्यार्थी 81.60 टक्के प्राप्त करून पाचव्या स्थानावर राहिला. या गुणवंत विद्यार्थ्यांचं शिक्षण संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.