शिवसेनेचे जिल्ह्यातील पहिले शाखाप्रमुख मनोहर वाघचवरे काळाच्या पडद्याआड

shivrajya patra

सोलापूर : शिवसेनेचे जिल्ह्यातील पहिले शाखाप्रमुख शनिवारी काळाच्या पडद्याआड गेले. मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी येथे शिवसेनेची जिल्ह्यातील पहिली शाखा स्थापन करून पहिला शाखाप्रमुख होण्याचा मान निष्ठावंत शिवसैनिक मनोहर (आबा) नारायण वाघचवरे यांच्या खात्यावर आहे. त्यांचं भांबेवाडी इथं राहत्या घरी वृध्दापकाळात निधन झाले. ते मृत्यूसमयी 74 वर्षीय होते.

हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ख्याती जुन्या अन् नव्या फळीच्या शिवसैनिकांत आजवर कायम आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

To Top