व्यापारी बांधवांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी वचनबध्द : नूतन संचालक हाजी मुश्ताक चौधरी

shivrajya patra

सोलापूर शहर बागबान जमियत सिटी ट्रस्टतर्फे हाजी मुश्ताक चौधरी यांचा सत्कार 

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लक्षवेधी निवडणुकीत मार्केट यार्डातील सर्व व्यापारी बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला नूतन संचालकपदी निवडून दिले, त्याबद्दल मी सर्व व्यापाऱ्यांचा मनापासून आभारी आहे. आगामी काळात व्यापारी बांधवांच्या अडी-अडचणी वा समस्या सोडविण्यासाठी वचनबध्द आहे, अशी ग्वाही नूतन संचालक हाजी मुश्ताक चौधरी यांनी दिली.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालकपदी हाजी मुश्ताक चौधरी यांची निवड झाल्याप्रित्यर्थ सोलापूर शहर बागबान जमियत सिटी ट्रस्टतर्फे सोलापूर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना हाजी मुश्ताक चौधरी बोलत होते. सोलापूर शहर बागबान जमियतचे अध्यक्ष डॉ. मन्सूर दलाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

प्रारंभी सोलापूर शहर बागबान जमियतचे अध्यक्ष डॉ. मन्सूर दलाल यांनी हाजी मुश्ताक चौधरी यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा ओझरता उल्लेख करताना आगामी वाटचालीत त्यांच्या लोकहिताच्या कार्याचा आलेख असाच उंचावत राहावा, अशी प्रांजळ अपेक्षा व्यक्त केली. 

कार्यक्रमास नसीरअहमद खलिफा, अॅड. रफिक बागबान, राजा बागबान, मौलाबक्ष तुळजापुरे, म. इकबाल दलाल, अल्ताफ लिंबूवाले, इम्तियाज दलाल, फय्याज बागबान, मुश्ताक बागबान, रईस बागबान, म. सादीक बागबान, मुश्ताक खलिफा, नाजीम कामतीकर, दाऊद बागबान, इफ्तेखार तुळजापुरे, एजाज बागबान, हाफिज अ. रजाक, हाफिज अ. सलाम आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष अल्ताफ लिंबूवाले यांनी केले.

To Top