धामोरी गावाजवळील शिवार वाहतुकीचा खोकड रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी

shivrajya patra

धामोरी/प्रतिनिधी : कोपरगांव तालुक्यातील धामोरी गावाजवळील वाहतुकीसाठी मुख्य रस्ता समजला जाणारा खोकड रस्ता हा येथील शेतकरी व धामोरी ग्रामस्थ नागरिक  व शैक्षणिक विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी तसेच दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण समजला जातो. या रस्त्याची अवकाळी पावसातच दुर्दशा झाली आहे. हा रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरीत आहे.

हा रस्ता नवनाथनगर भागातील आनंदवल्ली येथील साई मंदिर या ठिकाणापासून पुढे ठाकरे मळा, वाणी मळा, काळोखे मळा, पगार मळा व पुढे मोठा जगझाप मळा येथे मिळतो, परंतु या रस्यावर अवकाळी पावसाने रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.जनतेला या चिखल-पाण्यातून वाट काढावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

तरी संबंधित बांधकाम विभाग अधिकारी यांनी या शिवार वहातुक रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा करावी, अशी मागणी येथील परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

To Top