सासरी जाण्याकरीता एस. टी. त बसलेली विवाहिता लहानग्या मुलीसह बेपत्ता

shivrajya patra

सोलापूर : सासरी जाण्यासाठी लहान मुलीसह एस.टी. बसमध्ये बसलेली २० वर्षीय विवाहिता इच्छित स्थळी उतरलेली नाही. हा प्रकार ०७ मे रोजी दुपारी घडलीय. ज्योती (वय-२० वर्षे) असं मुलीसह बेपत्ता झालेल्या विवाहितेचं नांव आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बेपत्ता रजिस्टरला नोंद झाली असल्याचे सांगण्यात आलंय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका माऊलीने तिची विवाहित मुलगी सौ. ज्योति हिला तिच्या लहान मुलीसह सासरी म्हसवड ला जाण्याकरीता बस स्थानकातून सोलापूर-सातारा एस.टी. त बसवून पाठविले, मात्र ते दोघे ही सासरी न जाता बेपत्ता झाल्याचा अर्ज फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झालाय. 

बेपत्ता विवाहितेचे वर्णन खालील प्रमाणे आहे.

संपूर्ण नाव : सौ. लक्ष्मी ऊर्फ ज्योति (वय-२० वर्षे) रंग- गोरा, उंची-०५ फुट, बोलता येणाऱ्या भाषा-हिंदी, मराठी व कन्नड आणि अंगाने सडपातळ, अंगावर नेसती आकाशी निळी साडी असून तिचं शिक्षण- ०७ वीपर्यंत झालं आहे.

बेपत्ता लहान मुलीचे वर्णन खालील प्रमाणे आहे. 

संपूर्ण नाव-कु. मुद्रा (वय-३ वर्षे), रंग-गोरा, उंची अंदाजे ०३ फुट, बांधा-मध्यम, अंगावरील नेसते फ्रॉक असं वर्णन असल्याचं सांगण्यात आलंय.

याबाबत अधिक माहिती असणाऱ्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ./४७२ एम.जी. कटारे यांच्याशी संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आलं आहे.

To Top