'इच्छा शक्ती असली की, सर्वकाही होतं शक्य' या संदेशानं प्रार्थना फाऊंडेशनच्या कृतिशील तरुणाई शिबिराची सांगता
सोलापूर : आजच्या तरुण पिढीने देशाला सक्षम बनवण्यासाठी कृतिशील राहणं गरजेचं आहे. स्वतःमध्ये आत्मविश्वास व इच्छा शक्ती असली की सर्व काही शक्य होऊ शकतं. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, मग भले ते क्षेत्र कोणतंही असो तिथे भ्रष्टाचार न करता प्रामाणिकपणे काम करत राहिला तर ती सुद्धा एक देश सेवाच आहे, असे मत युवा उद्योजक रोहन देशमुख यांना यावेळी व्यक्त केले.
प्रार्थना फाऊंडेशन व सेवादायी सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून मोरवंची येथे कृतिशील तरुणाई शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी ते तरुणांशी संवाद साधत होते.
युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग क्षेत्रात येन गरजेचं आहे.उद्योग क्षेत्रात खूप संधी उपलब्ध आहेत.आपण स्वतः उद्योजक बनून इतरांना ही कामाची संधी उपलब्ध करून देऊ शकतो, असं मत अमित जैन यांनी यावेळी व्यक्त केलं.

मोरवंची येथे पार पडलेल्या तिसऱ्या कृतिशील तरुणाई शिबिरात राज्यभरातून तरुण सहभागी झाले होते. या तरुणाईला आर्थिक, सामाजिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्टीने कृतिशील व सक्षम बनवण्यासाठी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिबिरार्थ्यांनी आपले शिबिरातील अनुभव ही व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिबिरार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कृतिशील तरूणाई शिबिराच्या समारोपप्रसंगी अमित जैन, सूर्यभान धोत्रे, PSI प्रमोद मेरड,अभिनंदन गायकवाड, मनीषा सरवळे, विष्णू भोसले, साहिल तुपे तर प्रार्थना फाऊंडेशनचे अनु मोहिते, शुभम मिसाळ, पांडुरंग तुपसमुद्रे, इरफान मुलाणी, गणेश डुरे आदी मान्यवर उपस्थित होते.