न्यू जॉगर्स फाउंडेशनतर्फे 10 वी-12 वीतील गुणवंत विद्यार्थी आणि फौंडेशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी व 12 वी वर्गातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ न्यू जॉगर्स फाउंडेशनच्या वतीने शासकीय मैदान नेहरूनगर येथे आयोजित करण्यात आला होता.

न्यू जॉगर्स फाउंडेशनच्या नवनिर्वाचित पदाधिकारी आणि बाली मांडेपू यांची सफाई कामगार ट्रेड युनियन महाराष्ट्र स्टेटच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

१० वी उत्तीर्ण विद्यार्थी विश्वजीत हौसनूर, कृतिका बँकापुरे, अंजली औरसंग, संस्कृती अरवतु, हर्षवर्धन नलावडे आणि १२ वी उतीर्ण प्रतीक नसले या विद्यार्थ्यांना शाल आणि कृष्ण तुळस सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी संतोष आरवत्तू, वीरेश नसले, अंबादास यादव, प्रकाश जाधव, प्रशांत जोशी, भरत धनशेट्टी, शिवराज कांबळे, अण्णप्पा संगोळगी, जितेंद्र बंकापुरे, शांताराम शिंदे, दीपक नलावडे, उमेश पवार, दिलीप कदम, विजयसिंह बायस, योगेश जोशी, संतोष कदम, सुहास साळुंखे, आतिश लकडे, सुहास अभंगराव, विजय पाटील, मुन्ना राठोड, काशिनाथ औरसंग, सतीश घोडके, गुरुलिंग प्रचंडे, डॉ. शिवप्पा मलाडे, अशोक देशपांडे आणि शिवशंकर लाळसंगी आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.


To Top