कासेगाव/प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव इथं गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा तडाख्यात शेतकऱ्यांसह मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळालं. कासेगांवमधील शेतकरी नारायण धर्मा चौगुले यांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेल्याने साठवणुकीसाठी ठेवलेल्या कांद्याचं भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वादळी वारा आणि अवकाळी पाऊसानं काही शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्याचं नुकसान झालं असून जनावरं बांधयची कुठं अशी अवस्था या भागातील शेतकऱ्यांची झालीय.
जवळपास गेल्या पंधरवड्यापासून या भागात अवकाळीचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. नदी-नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. गुरुवारी रात्री झालेल्या पाऊस हा जवळपास 85 ते 90 मिलिमीटर पडल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलंय.
कालचा पाऊस एवढा मोठा होता की, काल रात्रीपासून ते आज दुपारी एक वाजेपर्यंत कासेगांव ते बिरोबा वस्ती व कासेगाव-उळेगांव, कासेगांव-वडजी या रोडवरील वाहतूक पूर्णतः बंद होती, परिणामी अनेकांना आपली आजची कामे थांबून गावातच वाट पाहत थांबावं लागलं.
याबाबत माहिती देताना नुकसानग्रस्त शेतकरी नारायण धर्मा चौगुले यांनी सांगितले की, माझा उन्हाळी कांदा 80 ते 90 गोण्या नुकताच काढून मी पाऊस पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी गाय गोठ्याच्या मध्ये टाकला होता, परंतु काल वादळी वाऱ्यासह झालेले पावसामुळे हा गोठा पूर्ण चा खांबानिशी उन्ममळून पडला, व संपूर्ण कांदा भिजून नुकसान झाले आहे. 
एक तरी कांदा पिकास योग्य असा भाव नाही गेल्या पंधरा दिवसापासून या परिसरात दररोज अवकाळी चा तडाखा या भागाला बसत आहे. या भागातील पाझर तलाव, नाले बंधारे भरून आले, तुडुंब भरून गेली बारा दिवस वाहत आहेत.
जवळपास या भागात गेल्या पंधरा दिवसापासून 250 ते 300 मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाल्याचं सांगण्यात आलंय. याबाबतीत प्रशासनाकडून पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे, असं असलं तरी अद्यापही प्रशासनाकडून कोणतीच हालचाल झाली नसल्याचे दिसून येत आहे. कधी नव्हे एवढा मे महिन्यात वरून राजा दररोजच बरसला असल्याने शेतकऱ्यांची मात्र तारांबळ होताना दिसते आहे.
खरीप पूर्व मशागतीचा हंगामाचा शेवटचा टप्पा असल्याने शेतकऱ्याची अनेक कामे खोळंबून पडले आहेत. परिणामी गेल्या पंधरा दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे या भागातील शेतावर मोठ्या प्रमाणात तण उगवली असून पावसानं लवकर उघडत नाही, दिल्यास खरीप पिकासाठी पेरणी होईल की नाही, अशी शंका शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
