नवले गुरुजींच्या सेवानिवृत्ती भव्य सत्कार सोहळ्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी आले एकत्र

shivrajya patra

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील जि प शाळा दहिटणे येथील शिक्षक पुंडलिक नवले गुरुजी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार करण्यात आला. या शाळेतील इयत्ता चौथी सन 1998-99 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नवले गुरुजी यांच्या भव्य सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला. 

शकुंतला जोजन मॅडम, महादेव मैत्री गुरुजी, केंद्रप्रमुख धडके, कोकणे मॅडम, वजीर शेख गुरुजी, विजय जोजन गुरुजी या सर्व शिक्षकांचाही विद्यार्थ्यांच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण पोपसभट गुरुजी होते.

यावेळी या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा देखील आनंदात साजरा करण्यात आला.  जिल्हा परिषदेच्या माजी विद्यार्थ्यांकडून आपल्या शिक्षकांचा सत्कार होणे, हे कदाचित महाराष्ट्रातील पहिलाच कार्यक्रम असावा, अशा शब्दात गुरुजन वर्गाने आपलं मनोगत व्यक्त केले.

खूप सुंदर व सुरेख कार्यक्रमाचं नियोजन व सत्काराबद्दल गुरुजींनी या बॅचच्या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करताना मनस्वी आभार मानले. यावेळी या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाबद्दल मनोगत व्यक्त केले.

सन 1998-99 च्या बॅचचे विशाल पाटील, सतीश स्वामी, सागर शिदे, अविनाश पाटील, हरून नदाफ, राम शिंदे,  सुनंदा हुल्ले, वैशाली  गोरे,  वंदना गुजोटी, विजया बझले, कल्पना गाडेकर, अबिक घोडके, सुमीता हिरेमठ, यास्मीन शेख, कविता चौधरी यासह अन्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट स्नेह भोजनाची झाली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनंदा हुल्ले यांनी केलं तर हरून नदाफ यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले.

To Top