सोलापूर : येथील दि प्रोग्रेसिव्ह हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. झिया जमीर मुजावर हिने दहावीच्या परीक्षेत 80 टक्के गुण घेऊन यश संपादन केले.
कु. झिया मुजावर हिने शालांत प्रमाणपत्र परिक्षा 2024-25 या परिक्षेत इंग्रजी विषयात - 84 गुण, मराठी-हिंदी 86 गुण, उर्दू-75 गुण, बिजगणित-76 गुण, विज्ञान आणि तंत्रज्ञान- 75 गुण आणि सामाजिक शास्त्र-79 गुण या प्रमाणे एकूण 400 गुण प्राप्त करीत आपल्या यशाचा झेंडा फडकाविला. या यशाबद्दल नातेवाईकांनी अभिनंदन करून कुमारी झिया हिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
