Type Here to Get Search Results !

अमित आडके ०२ वर्षाकरीता तडीपार

सोलापूर : गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी, खून-जीवे ठार मारण्याचा प्रयत्न यासारखे गुन्हे दाखल असलेल्या अमित उर्फ पप्पू अप्पासाहेब आडके, (रा. किरकीरी आई चौक, मु.पो. देगांव) यास सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून ०२ वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय. 

अमित उर्फ पप्पू आडके याच्याविरूध्द सन २०१२, २०१९ व २०२४ या कालावधीमध्ये गंभीर गुन्हे दाखल असून त्यास तडीपार करण्याच्या अनुषंगाने फौजदार चावडी पोलीस ठाणेकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन अमित उर्फ पप्पू अप्पासाहेब आडके (रा. किरकीरी आई चौक, मु.पो. देगांव, ता. उत्तर सोलापूर) यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून ०२ वर्षाकरीता तडीपार केले. त्यास तडीपार केल्यानंतर नवी मुंबई येथे सोडण्यात आलं आहे.