Type Here to Get Search Results !

बसच्या चाकाखाली चिरडून विद्यार्थ्याचा करुण अंत; नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

सोलापूर : बेलाटी रस्त्यावर झालेल्या अपघातात १३ वर्षीय विद्यार्थी स्कूल बसच्या चाकाखाली चिरडून जागीच ठार झाला. ही हृदयद्रावक मंगळवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडली. अनुराग तिप्पण्णा राठोड (रा. बसवेश्वर नगर, देगांव) असं मृताचं नांव आहे. अपघातस्थळी तोबा गर्दी झाली होती. स्कूल बस चालकास सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अपघातास कारणीभूत ठरलेली बस पोलीस ठाण्यात आणलीय.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे येथील संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रम शाळेचे विद्यार्थी स्कूल बस ने प्रवास करीत होते. या विद्यार्थ्यांपैकी अनुराग राठोड याचा बसच्या चाकाखाली चिरडून करूण अंत झाला.

घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे असं म्हणणं होतं कि, त्या स्कुल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवास करत होते. चालत्या गाडीतून तो विद्यार्थी खाली पडला, त्याच गाडीची चाके त्याच्या डोक्यावरुन गेल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन अवघ्या काही सेकंदातच विद्यार्थी जागीच मरण पावला.

पुढील वैद्यकीय तपासणी करण्यासाठी विद्यार्थ्या चं शव सिव्हील हॉस्पिटल सोलापूर येथे नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये नागरिक व मृताच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती. जोपर्यंत संबधित स्कूल बस चालक व शाळा संस्था चालकांवर हलगर्जीपणा करुन मृत्युस कारणीभूत ठरल्यामुळे संबंधितावर गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका व मन:स्थितीत आप्तेष्ठ होते.