सोलापूर : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सांगता (विसर्जन) मिरवणूक रविवारी, २० एप्रिल रोजी निघणार आहे. मिरवणुकीमुळे मिरवणूक मार्गावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. या दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांचा अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरीता मिरवणूक मार्गावर जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिलीय.
रविवारी, २० एप्रिल रोजी च्या सकाळी १०.०० वा. पासून ते दिनांक २१ एप्रिल रोजी च्या पहाटे ०२.०० वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सांगता (विसर्जन) मिरवणूक मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतुकीस जाणेस व येणेस बंद करण्यात येत आहे. वाहतुकीस बंद करण्यात आलेले मार्ग आणि त्या देण्यात आलेले पर्यायी मार्ग पुढील प्रमाणे आहेत.
बंद करण्यात येणारा मार्ग
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सम्म्राट चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक
२. हॉटेल अॅम्बेसेडर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
३. छत्रपती शिवाजी महाराज चौक एम्प्लायमेंट चौक- वाडीया हॉस्पीटल मेकॅनिक चौक मेकॅनिक चौक सरस्वती चौक-चार पुतळा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक-डफरीन चौक-जुना चांदणी चौक महापौर निवास रेल्वे स्टेशन गांधी पुतळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक --
या मार्गावर मिरवणुकीत सामील होणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांचे वाहतुकीस व सदर मार्गावर वाहन पार्कीगसाठी बंदी राहील.
(अपवाद - पोलीस वाहने, रुग्णवाहीका, अग्नीशमन दलाचे वाहने व पोलीस ज्या वाहनास परवानगी देतील, अशी वाहने)
पर्यायी मार्ग
१) विजापूर रोड कडुन हैद्राबाद, तुळजापुर, पुणे कडे जाणारी वाहतुक पत्रकार भवन चौक महावीर चौक गुरुनानक चौक - संत -तुकाराम चौक - अशोक चौक शांती चौक जुना बोरामणी नाका मार्केट यार्ड मार्गे इच्छित स्थळी --
२) मंगळवेढा कडुन येणारी होटगी रोड व विजापुर रोड कडे जाणारी वाहतुक, मरीआई चौक नागोबा मंदिर - रामवाडी पोलीस -चौकी-मोदी बोगदा पत्रकार भवन मार्गे इच्छित स्थळी
३) जुना पुना नाका चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनधारकाने जुना पुना नाका जुना कारंबा नाका, जुना तुळजापूर नाका -बोरामणी नाका शांती चौक रंगभवन सातरस्ता मोदी पोलीस चौकी-मोदी बोगदा-रामवाडी दवाखाना रामवाडी पोलीस चौकी---ते रेल्वे स्टेशन किंवा जुना पुना नाका नवीन केगांव बायपास मार्गे देगांव नाका कडून मरिआई चौकी नागोबा मंदिर ते रेल्वे स्टेशन -या मार्गाचा वापर करावा
४) विजापूर, मंगळवेढा कडुन येणारे जड वाहतुक वाहनधारकाने नवीन केगाव बायपास रोडचा वापर करावा.
५) अक्कलकोट कडून येणाऱ्या जड वाहतुक वाहनधारकाने नवीन अक्कलकोट नाका शांती चौक जुना बोरामणी नाका-मार्केट यार्ड या मार्गाचा वापर करावा.
या जाहीरनाम्याने काढलेला आदेश रविवारी, २० एप्रिल रोजी च्या सकाळी १०.०० वा. पासून ते दिनांक २१ एप्रिल रोजी पहाटे ०२.०० वाजेपर्यत अंमलात राहील. सदर आदेशाचा भंग करणारा कायद्याप्रमाणे शिक्षेस पात्र होईल, असेही पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं आहे.