Type Here to Get Search Results !

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्काराने जननायक अभय रंगारी सन्मानित

अभय च्या आजवरच्या खडतर पण प्रेरणादायी जीवनावर चित्रपट निर्माण होणार ! 

भंडारा : मानवी मूल्याच्या  विचारांना आदर्श मानून विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार देण्यात येतो, कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात रविवारी, 13 एप्रिल रोजी सकाळी आयोजित सोहळ्यात महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते, राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत जननायक अभय डी. रंगारी यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक डॉ. सतीशकुमार पाटील, पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर, ज्येष्ठ साहित्यिक व कायदेतज्ज्ञ ॲड. कृष्णा पाटील, 'कोर्टाच्या पायरीवरून' या महान पुस्तकाचे लेखक, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल, कवी, लेखक व प्रकाशक अनिल म्हमाणे, दीक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विश्वासराव तरटे, मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांच्या उपस्थितीत चित्रपट निर्माते व दिग्दर्शक, अॅड. डॉ. रमेश विवेकी, अॅड. कृष्णा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कारासाठी जवळपास देशातील 3000 हून अधिक लोकांच्या कार्याची पाहणी करून मान्यवरांची निवड केली आहे. अभय यांचे कार्य हे फार धाडसाचे आणि परिवर्तन वादी आहेत. त्यांच्या स्टॅम्प पेपर वर चुनावी जाहीरनामा, समस्या आणि समाधान कार्ड ची दखल साऊथ फिल्म इंडस्ट्रीने घेऊन ""गेम चेंजर"" फिल्म मध्ये स्टॅम्प पेपर वर जाहीरनाम्याचा दुसऱ्या पार्टी ने आणि लोकांनी सुद्धा आदर्श घेऊन आग्रह करावा, अशी सिन दाखवली आहे.

याचाच अर्थ असा की, पूर्वी सिनेमात जे दिसत होते ते पाहूनच लोक तसे बनण्यासाठी किंवा करण्यासाठी धावपळ करीत असत, मात्र अभय ने याला छेद देऊन नविन ऐतिहासिक पार्श्वभूमी निर्माण केली आहे. अभय ने केले आणि चित्रपटाने दाखविले, याचाच एक पैलू म्हणून येणाऱ्या काळात अभय डी. रंगारी च्या जीवनावर अभय ने आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेऊन चित्रपट निर्मिती केली जाईल, जेणेकरुन येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल, असंही म्हटलं जातंय.