Type Here to Get Search Results !

मारहाण, चोरी-घरफोडीसारखे गुन्हे दाखल असलेला तरुण तडीपार

सोलापूर : चोरी-घरफोडीसारखे गुन्हे दाखल असलेल्या जमीर रशीद शेख (वय-२९ वर्षे) याला पोलीस आयुक्तालयानं सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून ०२ वर्षाकरीता तडीपार केलंय. त्यास तडीपार केल्यानंतर पुणे येथे सोडण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.

मुस्लिम पाच्छा पेठेतील कालिका मंदिराजवळील रहिवाशी जमीर शेख याच्याविरुध्द सन २०२१, २०२२ व २०२५ या कालावधीमध्ये नागरीकांना दमदाटी, मारहाण करुन दुखापत करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीसांचं म्हणणे आहे.

त्याच्याविरुध्द जेलरोड पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कवाडे यांनी कारवाई करीत तडीपार केलंय.